गुणवर्धित तांदूळ प्रकल्पाचे केंद्रीय चमुसमोर सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:46+5:30

राज्यात हंगाम २०१८-१९ मध्ये टाटा ट्रस्टमार्फत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व भामरागड या तालुक्यांमध्ये पोषणयुक्त तांदुळाचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. आता केंद्र शासनाने हंगाम २०१९-२० साठी दिनांक १४ ऑगस्टच्या पत्रान्वये देशातील एकूण १५ जिल्ह्यांत पोषणतत्त्व गुणसंवर्धित तांदूळ हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता दिलेली आहे.

Presentation to the Central Cham of Quality Rice Project | गुणवर्धित तांदूळ प्रकल्पाचे केंद्रीय चमुसमोर सादरीकरण

गुणवर्धित तांदूळ प्रकल्पाचे केंद्रीय चमुसमोर सादरीकरण

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती; १० राज्यांच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांची आरमोरीत भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : पोषणतत्व गुणसंवर्धित तांदूळ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत १० राज्यांच्या सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांची केंद्रीयस्तरावरील कार्यशाळा नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून त्या विविध राज्यांच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी आरमोरी येथील जेना मिलला भेट दिली. त्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील पोषणतत्व गुणसंवर्धित तांदळाच्या कामाचे सादरीकरण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्या अधिकाऱ्यांसमोर केले.
राज्यात हंगाम २०१८-१९ मध्ये टाटा ट्रस्टमार्फत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व भामरागड या तालुक्यांमध्ये पोषणयुक्त तांदुळाचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. आता केंद्र शासनाने हंगाम २०१९-२० साठी दिनांक १४ ऑगस्टच्या पत्रान्वये देशातील एकूण १५ जिल्ह्यांत पोषणतत्त्व गुणसंवर्धित तांदूळ हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार राज्यात पूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सदर प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे.
या प्रकल्पाचे सादरीकरण करण्याकरिता केंद्र शासनाच्या तसेच या प्रकल्पासाठी तयारी दर्शविलेल्या अन्य राज्यातील अधिकाºयांसाठी, राज्य शासनाच्या वतीने दि.१३ व १४ सप्टेंबर रोजी नागपूर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस केंद्र शासनाच्या ग्राहक कल्याण मंत्रालय तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव एस.जगन्नाथन उपस्थित होते. राज्य शासनाकडून अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक उपस्थित होते. तसेच नागपूर विभागाच्या पुरवठा शाखेचे उपायुक्त रमेश आढे, सहसचिव सतीश सुपे, अवर सचिव नेत्रा मानकामे, कक्ष अधिकारी निशा गारोळे उपस्थित होते. या अधिकाऱ्यांसोबत अन्य १० राज्यांचे सचिव दर्जाचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी सदर कार्यशाळेस उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हातील भेटीचे नियोजन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी सहकार्य केले. जेना राईस मिलचे मालक हैदरभाई पंजवानी यांनी यावेळी धानाची राईस मिलमध्ये होणारी प्रक्रिया याबद्दलची माहिती दिली. यावेळी टाटा ट्रस्टच्या गडचिरोली प्रतिनिधी सोनल फर्नांडीस डिसुझा सुद्धा उपस्थित होत्या.

असा असतो पोषणयुक्त तांदूळ
पोषणयुक्त तांदूळ म्हणजे १०० किलो तांदळामध्ये ९९ किलो आपला नेहमीचा तांदूळ असतो व पोषणयुक्त तांदूळ १ किलो मिसळून तो तयार केला जातो. यामध्ये लोह, विटामिन ए, बी ९ व बी १२ या पोषक तत्त्वांचा समावेश असतो. यामुळे अ‍ॅनिमिया या आजारावर मात केली जाते. गडचिरोली या आकांक्षित जिल्ह्यामध्ये अ‍ॅनिमियाग्रस्तांची संख्या जास्त असल्याने या जिल्ह्याची निवड या प्रकल्पासाठी केली आहे.

Web Title: Presentation to the Central Cham of Quality Rice Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.