मनोजला आत्मसमर्पणास तयार करा

By Admin | Updated: May 17, 2015 02:16 IST2015-05-17T02:16:58+5:302015-05-17T02:16:58+5:30

नक्षल चळवळीत गळचेपी होत आहे. मनोज उसेंडी याचे कुटुंबीयाकडे दुर्लक्ष होत आहे.

Prepare Manoj to surrender | मनोजला आत्मसमर्पणास तयार करा

मनोजला आत्मसमर्पणास तयार करा

उसेंडी कुटुंबीयांना सल्ला : पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली नक्षल सदस्यांच्या नातेवाईकांची भेट
एटापल्ली : नक्षल चळवळीत गळचेपी होत आहे. मनोज उसेंडी याचे कुटुंबीयाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मनोज उसेंडी याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्यासाठी कुटुंबीयांनी त्याचे मनपरिवर्तन करावे, असा सल्ला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह उपस्थित पोलीस अधिकारी उसेंडी कुटुंबीयाला दिला.
पोलीस अधिकाऱ्यांनी डीव्हीसी नक्षल सदस्य मनोज ऊर्फ पप्पा उसेंडी यांच्या परसलगोंदी या गावी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट बुधवारी घेतली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अहेरीचे उपविभागीय अधिकारी रमेश धुमाळ, एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी दत्ता नलावडे, हेडरी पोलीस मदत केंद्राचे ठाणेदार जयसिंग राजपुत व एटापल्लीचे माजी पं. स. सभापती मंगू मट्टामी आदी उपस्थित होते.
डीव्हीसी नक्षल सदस्य मनोज उसेंडी हा गेल्या २० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रीय आहे. भेटीदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी मनोजच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यांना आत्मसमर्पण योजनेची माहिती देऊन आत्मसमर्पणामुळे कुटुंबाचा विकास होतो. पोलिसांमार्फत आर्थिक व शैक्षणिक सोयीसुविधा पुरविण्यात येतील, असे आश्वासनही पोलीस अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना यावेळी दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Prepare Manoj to surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.