मार्र्कं डा यात्रेची तयारी युध्दपातळीवर सुरू

By Admin | Updated: February 15, 2015 01:02 IST2015-02-15T01:02:46+5:302015-02-15T01:02:46+5:30

मार्र्कंडेश्वराच्या यात्रेसाठी मार्र्कंडा येथे युध्दपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा यात्राकाळात स्वच्छतेवर प्रचंड भर दिला जाणार आहे.

Preparations for Marrakkam Yatra continue on the war | मार्र्कं डा यात्रेची तयारी युध्दपातळीवर सुरू

मार्र्कं डा यात्रेची तयारी युध्दपातळीवर सुरू

चामोर्शी : मार्र्कंडेश्वराच्या यात्रेसाठी मार्र्कंडा येथे युध्दपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा यात्राकाळात स्वच्छतेवर प्रचंड भर दिला जाणार आहे. संडास, मुत्रीघर व इतर प्रसाधनगृह सतत स्वच्छ राहावी म्हणून २० सफाई कामगार यात्राकाळात कार्यरत राहणार आहे. याशिवाय महिलांसाठी अस्थायी स्नानगृह व पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रा परिसरात जिल्हा परिषद अंतर्गत चामोर्शी पंचायत समिती संपूर्ण व्यवस्था पाहते. यात्राकाळात स्वच्छता, पाणी पुरवठा व विद्युत व्यवस्था यासाठी ४८ हजार ८०० रूपये मंजूर झाले. परंतु ते प्राप्त झाले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामाला गती येऊ शकलेली नाही. ३१ जानेवारी रोजी आढावा बैठकीत ज्या-ज्या विभागांनी मोबाईल, संडास व मुत्रीघर तसेच प्रसाधनगृह देण्याचे मान्य केले होते. ते यात्रास्थळापर्यंत अद्याप पोहोचलेले नाही. पंचायत समिती प्रशासनाला यात्रा व्यवस्थापनेसाठी १ लाख ५० हजार रूपये खर्च करण्याची मंजुरी देण्यात आली, अशी माहिती आहे.
वन विभागाने मार्र्कंडेश्वर वनोद्यान येथे उभारले आहे. त्याचे लोकार्पण पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी खासदार अशोक नेते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. वनोद्यानदेखील यात्रेकरूंसाठी व भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू यंदा पहिल्यांदाच राहणार आहे. लहान मुलांसाठी विशेष ज्ञान संवर्धनाची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. यात्रा काळात अनेक मनोरंजनाचे साधन येतात. त्याची बांधणी सध्या सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळही यात्रेकरूंच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
मंदिर परिसरात व्यवस्था झाली पूर्ण; पालकमंत्री करणार महापूजा
१७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मार्कंडेश्वराची महापूजा होणार आहे. सोबत गुरव पुजारी पंकज पांडे व शुभांगी पांडे सपत्नीक सहभागी होणार आहे. यात्रा काळात मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसरात अस्थायी स्वरूपाची विद्युत व्यवस्था, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्था, भक्तांसाठी अल्प विश्रांतीची अस्थायी निवास व्यवस्था, संरक्षण कठडे, महाप्रसाद वितरण व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या सर्व पूर्ण करण्यात आल्या आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Preparations for Marrakkam Yatra continue on the war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.