रक्तदानाच्या महायज्ञाची तयारी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:24 IST2021-06-30T04:24:05+5:302021-06-30T04:24:05+5:30

२ जुलै रोजी गडचिरोलीत पोलीस हॉस्पिटल येथे सकाळी १० वाजतापासून सुरू होणाऱ्या शिबिरासाठी जिल्हा पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. ...

Preparations for blood donation are in full swing | रक्तदानाच्या महायज्ञाची तयारी जोरात

रक्तदानाच्या महायज्ञाची तयारी जोरात

२ जुलै रोजी गडचिरोलीत पोलीस हॉस्पिटल येथे सकाळी १० वाजतापासून सुरू होणाऱ्या शिबिरासाठी जिल्हा पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. यात शहरातील इच्छुक रक्तदाते रक्तदान करू शकतात. याशिवाय ५ जुलैला साई नर्सिंग स्कूल आरमोरी, ६ जुलैला ग्रामीण रुग्णालय चामोर्शी, ११ जुलैला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली येथे शिबिर होणार आहे. या सर्व शिबिरांमधून गोळा होणाऱ्या रक्तसाठ्यातून गरजवंतांना वेळेवर रक्त मिळून त्यांचा जीव वाचावा यासाठी प्रयत्न केले जात आहे.

या शिबिरांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, इन्व्हेंट संयोजिका रश्मी आखाडे यांनी केले आहे.

(बॉक्स)

शिबिरांची तारीख आणि स्थळ

१) २ जुलै - पोलीस हॉस्पिटल, गडचिरोली

२) ५ जुलै - साई नर्सिंग स्कूल, आरमोरी

३) ६ जुलै - ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी

४) ११ जुलै - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोली

Web Title: Preparations for blood donation are in full swing