गर्भवती महिलेने दिला विचित्र बाळास जन्म

By Admin | Updated: August 22, 2016 02:14 IST2016-08-22T02:14:41+5:302016-08-22T02:14:41+5:30

तालुक्यातील डोडीटोेला येथील गर्भवती महिलेने अर्धे शरीर असलेल्या अविकसित विचित्र बाळास जन्म दिल्याची घटना

Pregnant woman gave birth to strange baby | गर्भवती महिलेने दिला विचित्र बाळास जन्म

गर्भवती महिलेने दिला विचित्र बाळास जन्म

एटापल्ली रुग्णालयातील घटना : अर्धे शरीर अविकसित
एटापल्ली : तालुक्यातील डोडीटोेला येथील गर्भवती महिलेने अर्धे शरीर असलेल्या अविकसित विचित्र बाळास जन्म दिल्याची घटना एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात रविवारी रात्री १२.१० वाजताच्या सुमारास घडली.
एटापल्ली तालुक्यातील डोडीटोला येथील गर्भवती महिला सिंधू विनोद पुंगाटी (२२) हिला प्रसूतीसाठी एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास भरती करण्यात आले. यावेळी रुग्णालयात कार्यरत असलेली अधिपरिचारिका सोनाली कुमरे यांनी सदर महिलेची प्रसूती केली. या महिलेने रात्री १२.१० वाजताच्या सुमारास बाळास जन्म दिला. मात्र सदर बाळ अर्धविकसित असल्याने सर्वांना धक्का बसला. या जन्मलेल्या बाळाच्या पोटापर्यंत शरीराचा अर्धा भाग तसेच तोंड व दोन्ही हात व्यवस्थित होते. मात्र पोटाखालील अर्धा भाग पूर्णत: अविकसित असल्याचे दिसून आले. या अर्ध्या भागातून आतड्या बाहेर आल्याचे दिसूून आले. सदर बाळ जवळपास १ तास जीवंत होते. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सिंधू पुंगाटी या महिलेची ही पहिलीच प्रसूती असून प्रसूतीनंतर सदर महिला सुखरूप आहे. तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंंद्र तोबडाच्या परिचारिका अंजू बिश्वास यांनी सदर महिलेची प्रसूतीची तारीख १७ सप्टेंबर २०१६ रोजी होती असे सांगितले.
अशा प्रकारची केस आपण पहिल्यांदाच बघितली आहे. याविषयी निश्चित असे काहीही सांगता येणार नाही, असे एटापल्ली ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावेश वानखेडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

अशा प्रकारचे अविकसित बाळ जन्माला येण्यामागे एकच कारण असू शकत नाही, याला अनेक कारणे असू शकतात. जोपर्यंत जन्मलेल्या सदर बाळाच्या संपूर्ण अवयवाची तपासणी होणार नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे बाळ जन्मल्याचे नेमके कारण सांगता येणार नाही.
- डॉ. कन्ना मडावी, स्त्रिरोग तज्ज्ञ तथा वैैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, अहेरी

Web Title: Pregnant woman gave birth to strange baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.