मृत्युदर कमी करण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:39 IST2021-05-08T04:39:05+5:302021-05-08T04:39:05+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतला व जिल्ह्यात लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे ...

मृत्युदर कमी करण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य द्या
देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतला व जिल्ह्यात लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जि. प. सीईओ कुमार आशीर्वाद, नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेताना किती प्रमाणात लसीकरण झाले याबाबतची माहिती जाणून घेतली. अधिकाधिक लोकांना लस कशी उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.