मान्सूनपूर्व शेती कामाची लगबग वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:58+5:30

शेतातील केरकचरा, मातीकाम, वखरणी आदी कामे शेतकरी सध्या करीत आहेत. पावसाचे रोहणी नक्षत्राचे पहिले चरण सुरू आहे. रोहिणीच्या पावसानंतर शेतजमिनीत ओलावा आल्यावर शेतकरी धानाचे पºहे टाकत असतात. शेतकऱ्यांना गतवर्षी पावसाच्या हुलकावणीला तोंड द्यावे लागले.

Pre-monsoon farming work increased almost | मान्सूनपूर्व शेती कामाची लगबग वाढली

मान्सूनपूर्व शेती कामाची लगबग वाढली

ठळक मुद्देशेतकरी बांधावर : वाढत्या तापमानामुळे सकाळीच कामे करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : मे महिना संपून जून महिना सुरू झाला आहे. जून महिन्यापासूनच पाऊस बरसत असल्याने चामोर्शी तालुक्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व शेतातील कामे आटोपण्यावर भर दिला आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळच्या सुमारास शेतातील विविध कामे करण्यावर शेतकरी भर देत आहेत.
शेतातील केरकचरा, मातीकाम, वखरणी आदी कामे शेतकरी सध्या करीत आहेत. पावसाचे रोहणी नक्षत्राचे पहिले चरण सुरू आहे. रोहिणीच्या पावसानंतर शेतजमिनीत ओलावा आल्यावर शेतकरी धानाचे पºहे टाकत असतात. शेतकऱ्यांना गतवर्षी पावसाच्या हुलकावणीला तोंड द्यावे लागले. परिस्थितीवर मात करत तालुक्यातील शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात धान पिकाची लागवड करण्यासाठी तेवढ्याच उमेदीने तयारी करीत आहेत. कोरोना महामारीमुळे शेतजमिनी वगळता इतरत्र कामे नाही. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकरी मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामात स्वत:ला व्यस्त ठेवत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी गतवर्षीपेक्षा यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनपूर्व शेतातील कामे लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून येत्या दोन-तीन दिवसांत तालुक्यासह जिल्ह्यात पाऊस झाल्यास बरेच शेतकरी जूनच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात धानाचे पºहे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामातील धान व इतर पिकांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तालुक्यातील कृषी केंद्रात खते, बियाणे, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करण्यात आले आहेत.

Web Title: Pre-monsoon farming work increased almost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती