जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी प्रंचित पाेरेड्डीवार बिनविराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:37 IST2021-02-16T04:37:40+5:302021-02-16T04:37:40+5:30
ही निवड २०२०-२०२१ ते २०२५-२०२६ या कालावधीसाठी आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ज्ञानेश्वर खाडे यांच्या अध्यक्षतेखाली १५ फेब्रुवारी राेजी ...

जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी प्रंचित पाेरेड्डीवार बिनविराेध
ही निवड २०२०-२०२१ ते २०२५-२०२६ या कालावधीसाठी आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ज्ञानेश्वर खाडे यांच्या अध्यक्षतेखाली १५ फेब्रुवारी राेजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा आयाेजित करण्यात आली हाेती. अध्यक्ष पदासाठी प्रंचित पाेरेड्डीवार, उपाध्यक्ष पदासाठी श्रीहरी भंडारी व मानद सचिव पदासाठी अनंत साळवे यांचे प्रत्येकी एक-एक नामांकन प्राप्त झाले. त्यामुळे अध्यासी अधिकाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांची निवड बिनविराेध झाली असल्याचे जाहीर केले. सभेला सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय सुरजुसे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.
सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांचीही निवड बिनविरोध झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांमधील समन्वय आणि विश्वास सिद्ध करणारी ही निवडणूक ठरली आहे. अरविंद पोरेड्डीवार आणि प्रकाश पोरेड्डीवार यांच्या कार्यकाळात कठीण परिस्थितीत बँकेचा विस्तार करून वटवृक्षात रुपांतर झाल्यामुळे आजही भागधारकांमध्ये तो विश्वास कायम असल्याचे दिसून येते.
(बॉक्स)
सलग तिसऱ्यांदा निवड होणारे एकमेव अध्यक्ष
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेपासून सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होणारे प्रंचित पोरेड्डीवार हे एकमेव आहेत. बँकेचे पहिले अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी आणि त्यानंतर प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी सलग दोन-दोन वेळा अध्यक्षपद भूषविले. पण तत्कालीन सहकार कायद्यामुळे त्यांना सलग तिसऱ्या वेळी अध्यक्षपदी राहता आले नाही. त्यानंतर सहकार कायद्यात बदल झाला. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड होण्याचा बहुमान प्रंचित पाेरेड्डीवार यांना मिळाला.