नक्षल्यांच्या घोड्यांपैकी एकाने सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:16 IST2017-08-29T00:16:31+5:302017-08-29T00:16:53+5:30

छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या जंगलातून नक्षलवाद्यांचे शिबीर उद्ध्वस्त करताना पोलिसांच्या हाती लागलेल्या ....

Pran survived one of the cavalry horses | नक्षल्यांच्या घोड्यांपैकी एकाने सोडला प्राण

नक्षल्यांच्या घोड्यांपैकी एकाने सोडला प्राण

ठळक मुद्देअबुझमाड जंगलातून १५ दिवसांपूर्वी केले होते जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या जंगलातून नक्षलवाद्यांचे शिबीर उद्ध्वस्त करताना पोलिसांच्या हाती लागलेल्या नक्षलवाद्यांच्या सहा घोड्यांपैकी एका घोड्याने रविवारी प्राण सोडला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.
गेल्या १२ आॅगस्ट रोजी छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अपर पोलीस अधीक्षक (नक्षल अभियान) डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात विशेष अभियान पथकाची तुंडेवारा व पोकनार गावाजवळील जंगलात नक्षलवाद्यांशी चकमक उडाली. यावेळी पोलीस वरचढ ठरत असल्याने नक्षलवादी आपले साहित्य तिथेच टाकून जंगलाच्या दिशेने पळून गेले. यावेळी त्या ठिकाणी सहा घोड्यांसह तीन भरमार बंदुका व दैनंदिन वापराचे इतर साहित्य आढळले होते. हे घोडे अहेरीतील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले होते. तिथेच त्यांना दैनंदिन चारा दिला जात होता.
प्राप्त माहितीनुसार, न्यायालयाच्या परवानगीने हे घोडे कोंडवाड्यात ठेवले जाणार होते. परंतू गेल्या १५ दिवसांत बºयाच सरकारी सुट्या आल्यामुळे ती प्रक्रिया होऊ शकली नाही. यादरम्यान रविवारी (दि.२७) सहापैकी एक घोडा दगावला.
जंगलातील मोकळ्या वातावरणात फिरण्याची सवय असणाºया या घोड्यांना एका जागी बंदिस्तपणे राहणे मानवले नसल्याचे बोलले जाते. मात्र घोड्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही.

Web Title: Pran survived one of the cavalry horses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.