पं.स. कार्यालयातच गुरूजींचे आंदोलन
By Admin | Updated: July 26, 2016 01:19 IST2016-07-26T01:19:27+5:302016-07-26T01:19:27+5:30
शिक्षकांचे प्रलंबित वेतन, उशीरा होणारे वेतन यासह विविध प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ...

पं.स. कार्यालयातच गुरूजींचे आंदोलन
धानोरा : शिक्षकांचे प्रलंबित वेतन, उशीरा होणारे वेतन यासह विविध प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी धानोरा तालुक्यातील शेकडो शिक्षकांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असलेल्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. तसेच यावेळी शिक्षकांनी पं.स.च्या शिक्षण विभागाचा निषेध केला.
या आंदोलनात प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक परिषद, शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना यांचे पदाधिकारी व शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. समस्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा शिक्षकांनी घेतला. गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या निष्क्रीय धोरणामुळे शिक्षक अडचणीत आले आहेत, असा आरोपही शिक्षकांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)