शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता

By Admin | Updated: October 13, 2014 23:19 IST2014-10-13T23:19:25+5:302014-10-13T23:19:25+5:30

गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळ सोमवारी दुपारी थंड झाली. १५ आॅक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी

Power of propaganda campaign | शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता

शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता

पावसाने विरजण : गडचिरोली, आरमोरी, अहेरी क्षेत्रात निघाल्या सर्वच उमेदवारांच्या पदयात्रा, रॅली
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळ सोमवारी दुपारी थंड झाली. १५ आॅक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ३६ उमेदवार मैदानात आपले भाग्य अजमावित आहेत. ६७ आरमोरी विधानसभा मतुदार संघात सर्वाधिक १४ उमेदवार रिंगणात आहेत. ६८ गडचिरोली विधानसभा मतदार संघात १३ तर ६९ अहेरी विधानसभा क्षेत्रात ९ उमेदवार निवडणुक लढत आहेत. गेले १२ दिवस चाललेली प्रचाराची रणधुमाळ सोमवारी थांबली. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारासह प्रमुख अपक्ष उमेदवारांनीही आज अखेरच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
आरमोरी विधानसभा क्षेत्रात रविवारी विविध राजकीय पक्षांतर्फे प्रचार रॅली तालुका मुख्यालय व मोठ्या गावांत काढण्यात आली होती. आजही अखेरच्या दिवशी तालुका ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढून उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन केले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आनंदराव गेडाम, भाजपकडून क्रिष्णा गजबे, शिवसेनेकडून रामकृष्ण मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारायण वट्टी, बसपाकडून कोमल ताडाम (बारसागडे), भारतीय कम्युनिष्ठ पक्षाकडून हिरालाल येरमे, अपक्ष प्रमुख उमेदवारांमध्ये नंदू नरोटे, जयेंंद्र चंदेल, फारवर्ड ब्लॉककडून नारायण जांभुळे रिंगणात आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग वगळता आरमोरी विधानसभा क्षेत्रात एकाही मोठ्या नेत्याची प्रचारसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत झाली नाही. त्यामुळे काँग्रेस, भाजप, शिवसेना आदी पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज अखेरच्या दिवशी मतदार संघात रॅली काढली. गडचिरोली विधानसभा मतदार संघात रविवारपासूनच राजकीय पक्षांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. रविवारी शिवसेनेच्यावतीने चंद्रपूर मार्गावर मोटार- सायकल रॅली काढण्यात आली होती. आज अखेरच्या दिवशी सोमवारी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्र्टीच्या उमेदवारांनी शहरातून पदयात्रा काढून मतदारांना अभिवादन केले. भारतीय जनता पक्षाच्या रॅलीमध्ये उमेदवार डॉ. देवराव होळी यांच्यासह खासदार अशोक नेते व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहराच्या मुख्य मार्गावरून ही रॅली फिरविण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत उमेदवार भाग्यश्री आत्राम, संयोगिता हलगेकर, राकॉचे प्रदेश प्रतिनिधी सुरेश पोरेड्डीवार, अरूण हरडे आदींसह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्यावतीने रॅली काढण्यात आली. यात उमेदवार केसरी उसेंडी, न. प. चे उपाध्यक्ष रमेश चौधरी, प्रा. राजेश कात्रटवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बहुजन समाज पक्षाने इंदिरा गांधी चौकातून शहराच्या चारही मार्गावर पदयात्रा काढली. यावेळी उमेदवार विलास कोडाप व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्यावतीनेही चामोर्शी, धानोरा, गडचिरोली आदी तालुका मुख्यालयात रविवारपासूनच रॅली काढण्यात येत आहे. उमेदवार सगुणा तलांडी यांनी मतदारांना रॅलीच्या माध्यमातून अभिवादन केले.
अहेरी विधानसभा क्षेत्रातही आज अखेरच्या दिवशी अहेरी, आलापल्ली आदी दोन महत्वाच्या ठिकाणी रॅली काढण्यात आली. यांनी पदयात्रा व रॅली काढून आपले शक्तीप्रदर्शन केले. आज अहेरीत संततधार पाऊस असल्याने उमेदवारांनी पावसात भिजून मतदारांना अभिवादन केले. अहेरी विधानसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूधीर मुनगंटीवार यांच्या जाहीरसभा प्रचाराच्या काळात झाल्या. आज शक्तीप्रदर्शनानंतर उमेदवारांचे गुप्त प्रचार सुरू झाला आहे. त्या बरोबरच कोण आघाडीवर आहे. याबाबत सट्टा बाजारही आपले अंदाज बांधत आहे. स्लम भागात धनशक्तीचाही मोठा वापर होत आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील स्थितीवर निवडणूक व पोलीस विभाग लक्ष ठेवून आहेत. या क्षेत्रातील बहुतांश मतदान केंद्र अतिसंवेदनशील असल्याने अतिरिक्त पोलीस दलही तैनात करण्यात आले आहे.

Web Title: Power of propaganda campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.