रस्त्यावरील विद्युत खांबांमुळे हाेत आहे रहदारीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:43 IST2021-09-15T04:43:02+5:302021-09-15T04:43:02+5:30

आरमाेरी : येथील काही वाॅर्डात अंतर्गत रस्त्यांवर मधाेमध विद्युत खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धाेका बळावला आहे. भविष्यात येथे गंभीर ...

The power poles on the road are obstructing the traffic | रस्त्यावरील विद्युत खांबांमुळे हाेत आहे रहदारीस अडथळा

रस्त्यावरील विद्युत खांबांमुळे हाेत आहे रहदारीस अडथळा

आरमाेरी : येथील काही वाॅर्डात अंतर्गत रस्त्यांवर मधाेमध विद्युत खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धाेका बळावला आहे. भविष्यात येथे गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यावरील खांब हटवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गावातील अंतर्गत रस्त्यांनी वाहनांची नेहमीच वर्दळ असते. दुचाकी व चारचाकी वाहने ये-जा करीत असतात; परंतु मधाेमध असलेल्या खांबांमुळे अडथळा निर्माण हाेत आहे. आधीच येथील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. येथील रस्त्यावरून वाहनांची माेठ्या प्रमाणात रहदारी असते. काही ठिकाणच्या रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे, तर काही ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका बसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्यावरील वीज खांब हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वारंवार मागणी करूनही महावितरणच्या वतीने तसेच बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यावरील वीज खांब इतरत्र हलविण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. अनेक गावांमध्ये रस्त्यावर वाकलेले विद्युत खांब आहेत. काही ठिकाणी जाेड खांबांमुळे वाहने वळविता येत नाही. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

Web Title: The power poles on the road are obstructing the traffic