येनापूर परिसरात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:42+5:302021-07-21T04:24:42+5:30

येणापूर सबस्टेशनवरून परिसरातील जवळपास २० गावांना विजेचा पुरवठा केला जाते. पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून वीजपुरवठा खंडित हाेण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात ...

Power outage in Yenapur area | येनापूर परिसरात विजेचा लपंडाव

येनापूर परिसरात विजेचा लपंडाव

येणापूर सबस्टेशनवरून परिसरातील जवळपास २० गावांना विजेचा पुरवठा केला जाते. पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून वीजपुरवठा खंडित हाेण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. थाेडाही पाऊस किंवा वादळ झाला तरी वीजपुरवठा खंडित हाेते. एकदा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कित्येक तास वीज येत नाही. रात्री वीज नसल्यास नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागते. दिवसभर शेतात काम करून थकलेल्या शरीराला आराम मिळत नाही. त्यामुळे नागरिकांच्या तब्येती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणने ठाेस उपाययाेजना करावी, अशी मागणी वंदना गाैरकर यांनी केली आहे. गाैरकर यांनी उपविभागाीय अभियंता पीयूष ठाकरे व येणापूरचे सहायक अभियंता अभिषेक देशपांडे यांची भेट घेऊन त्यांच्यासाेबत चर्चा केली व निवेदन सादर केले.

200721\img-20210720-wa0164.jpg

विजेचा लपंडाव प्रसंगी निवेदन देताना चे फोटो

Web Title: Power outage in Yenapur area