१५ गावांचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:00:58+5:30
कोरची तालुक्यात एकूण तीन फिडर आहेत. त्यापैकी कोटराकडे जाणाºया फिडरवरच्या वीज जारांवर झाड कोसळले. त्यामुळे कोटरा परिसरातील सावली, कैमूल, शिकारीटोला, कोटरा, मुलेटीपदीकसा, हितापाडी, हत्तीकसा, बोगाटोला, हेटाळकसा, खुर्सीपार, राजाटोला, मर्केकसा, बिहिटेकला, बिहिटेखुर्द, नांदळी, जैतानपार, घुगवा या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला.

१५ गावांचा वीज पुरवठा खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुका मुख्यालयापासून १७ किमी अंतरावर येत असलेल्या कोटरा गावाजवळ एक झाड विद्युत तारांवर कोसळले. त्यामुळे कोटरा परिसरातील जवळपास १५ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज कर्मचाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न करून झाड हटविल्यानंतर वीज पुरवठा सुरू झाला आहे.
कोरची तालुक्यात एकूण तीन फिडर आहेत. त्यापैकी कोटराकडे जाणाऱ्या फिडरवरच्या वीज जारांवर झाड कोसळले. त्यामुळे कोटरा परिसरातील सावली, कैमूल, शिकारीटोला, कोटरा, मुलेटीपदीकसा, हितापाडी, हत्तीकसा, बोगाटोला, हेटाळकसा, खुर्सीपार, राजाटोला, मर्केकसा, बिहिटेकला, बिहिटेखुर्द, नांदळी, जैतानपार, घुगवा या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला.
कोरची तालुक्यात मागील पाच दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अशातच झाड कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र वीज कर्मचाऱ्यांनी झाड हटविले. तसेच वीजतारा जोडून शुक्रवारी वीज पुरवठा सुरळीत केला.
कोरची तालुक्यातील वीज कर्मचारी सतर्क असले तरी या तालुक्यातील विद्युत लाईन जंगलातून गेली असल्याने पावसाळ्यादरम्यान वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतात. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन दुरूस्त करणे कष्टप्रद आहे.
जंगलातून लाईन गेल्याने समस्या गंभीर
कोरची तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावे जंगलांनी वेढली आहेत. तसेच गावांची लोकसंख्या कमी आहे. एका गावापासून दुसरे गाव बºयाच दूर अंतरावर आहे. त्यामुळे काही गावांमधील वीज लाईन जंगलातून गेली आहे. पावसाळ्यात वादळवारा झाल्यानंतर एखादे झाड वीज लाईनवर कोसळून वीज पुरवठा खंडित होते. यामध्ये वीज कर्मचाऱ्यांचा काहीही दोष राहत नाही. नैसर्गिक कारणामुळे वीज पुरवठा खंडित होते. जमिनीतून केबल टाकल्यास झाड पडून वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या दूर होईल. मात्र भूमिगत केबल महागडे पडत असल्याने महावितरण लावत नाही. मात्र दुर्गम भागात भूमिगत लाईनशिवाय पर्याय नसल्याने भूमिगत लाईन टाकण्याची आवश्यकता आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींनी भूमिगत लाईन टाकण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी आहे.