विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:34 IST2021-03-28T04:34:43+5:302021-03-28T04:34:43+5:30

महाविकास आघाडी सरकारने विद्युत बिलात कुठलीही सवलत दिली नाही. भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करूनही सर्वसामान्य गोरगरीब ...

The power distribution company will not tolerate arbitrariness | विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही

विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही

महाविकास आघाडी सरकारने विद्युत बिलात कुठलीही सवलत दिली नाही. भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन

करूनही सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केराची टोपली दाखविली.

याबद्दल आमदार डॉ. देवराव होळी यांनी विद्युत विभागाचा जाहीर निषेध केला. गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिक व ग्रामपंचायत व शेतकरी बांधवांना जाहीर आव्हान केले की विद्युत वितरण कंपनीने जर आपले विद्युत कपात करण्यापूूर्वी जर पूर्वसूचना दिली नाही, तर विद्युत वितरण कंपनीविरोधात नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी व त्याची एक प्रत आमदार जनसंपर्क कार्यालय येथे पाठवावी, असे आवाहन गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिक व ग्रामपंचायत व शेतकरी बांधवांना केले, तसेच लवकरच पुन्हा महाविकास आघाडी सरकारविरोधात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात विराट आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: The power distribution company will not tolerate arbitrariness