कुरखेडा तालुक्यातील पाेलीस पाटलांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:50+5:302021-02-05T08:50:50+5:30

कुरखेडा : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीसपाटील संघटना व पोलीस स्थानक, कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्थानकाच्या सभागृहात पोलीसपाटील ...

Poverty of Paelis Patals in Kurkheda taluka | कुरखेडा तालुक्यातील पाेलीस पाटलांचा गाैरव

कुरखेडा तालुक्यातील पाेलीस पाटलांचा गाैरव

कुरखेडा : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीसपाटील संघटना व पोलीस स्थानक, कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्थानकाच्या सभागृहात पोलीसपाटील दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, काेराेना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील पाेलीसपाटलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीसपाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर होते. उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार ए. बी. मडावी, ठाणेदार सुधाकर देडे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद ब्राम्हणवाडे, सचिव मुरारी दहीकर, उपाध्यक्ष यशोधरा नंदेश्वर, गडचिरोली तालुकाध्यक्ष वासुदेव जेंगठे, सचिव भाऊसाहेब कोठारे, उपाध्यक्ष पंडित मेश्राम, आरमोरी तालुकाध्यक्ष दादाजी बनपूरकर, कुरखेडा तालुकाध्यक्ष योगराज नाकाडे, सचिव विश्वनाथ रामटेके तसेच तालुक्यातील सर्व पोलीसपाटील, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, पाेलीसपाटलांनी आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडताना काेराेनासंदर्भात खबरदारी घ्यावी, असे आवाहन एसडीपीओ जयदत्त भंवर यांनी केले.

संचालन प्रेमदास पंधरे यांनी केले, तर आभार कुंडलिक नैताम यांनी मानले.

Web Title: Poverty of Paelis Patals in Kurkheda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.