रस्त्यांवरील ट्रकमुळे अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:18+5:30
ठाणेगावनजीक मालवाहू ट्रक रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभी केली राहतात. रात्रीच्या सुमारास दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन चालकाला बाजुचे काहीच दिसत नाही. अशा वेळी केवळ अंदाजाने वाहन चालवावे लागते. अशातच रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, अगदी वळणावर सदर ट्रक उभी केली जातात. या ठिकाणी रस्ता अरूंद आहे.

रस्त्यांवरील ट्रकमुळे अपघाताची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी-गडचिरोली मार्गावर असलेल्या ठाणेगाव जवळील वळणावर रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठमोठे ट्रक उभे राहतात. या ट्रकांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरटीओ विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच या ठिकाणी ट्रक उभे ठेवण्यास प्रतिबंध घालावा, अशी मागणी होत आहे.
आरमोरी येथे मागील पाच दिवसांपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. आरमोरीतील नवरात्र उत्सव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्द आहे. गडचिरोली शहर व तालुक्यातील शेकडो नागरिक दरदिवशी आरमोरी येथे दुर्गा उत्सव पाहण्यासाठी येतात. दुर्गा बघितल्यानंतर रात्री उशीरापर्यंत ते गावाकडे परत जातात. ठाणेगावनजीक मालवाहू ट्रक रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभी केली राहतात. रात्रीच्या सुमारास दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन चालकाला बाजुचे काहीच दिसत नाही. अशा वेळी केवळ अंदाजाने वाहन चालवावे लागते. अशातच रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, अगदी वळणावर सदर ट्रक उभी केली जातात. या ठिकाणी रस्ता अरूंद आहे. डांबरी रस्त्याच्या बाजुला गवत उगवले आहे. त्यामुळे बाजुला वाहन नेणे शक्य होत नाही. रात्रीबरोबरच दिवसा सुध्दा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर वाहने गावात तसेच गावाच्या जवळपासही उभी केली जातात. नागपूरवरून अनेक नागरिक गडचिरोलीला रात्री उशीरापर्यंत स्वत:च्या चारचाकी वाहनाने जातात. त्यामुळे या मार्गावरून रात्री उशीरापर्यंत वर्दळ राहते.
आरटीओ विभागाने या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.