लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्याच्या प्रत्येक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते असून या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र देखभालीअभावी तालुक्यातील बऱ्याच पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत.शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. तालुक्यातील काही पांदण रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून मातीकाम झाले आहे. तर काही गावानजीकचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हे रस्ते पायवाट म्हणून अजुनही वापरले जात आहेत. मुरखळा परिसरात पांदण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पाण्याच्या डबक्यातून शेतकºयांना वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यात पांदण रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदण रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.चामोर्शी शहराच्या जुन्या मच्छीमार्केटपासून मार्र्कंडादेवकडे जाणाºया रस्त्यावर बाबुराव वासेकर यांच्या घराजवळ रस्ता पूर्णत: फुटलेला आहे. गिट्टी व डांबर उखडले असून येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथे मुरूम टाकून नुतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पांदण रस्त्याची दुरवस्था; शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST
शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. तालुक्यातील काही पांदण रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून मातीकाम झाले आहे. तर काही गावानजीकचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हे रस्ते पायवाट म्हणून अजुनही वापरले जात आहेत.
पांदण रस्त्याची दुरवस्था; शेतकरी त्रस्त
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : चामोर्शी शहर व तालुक्यातील अंतर्गत रस्ते चिखलमय