बँक ऑफ इंडिया येनापूर शाखेचा ढिसाळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:37 IST2021-04-01T04:37:05+5:302021-04-01T04:37:05+5:30

संजय गांधी निराधार योजना व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, तसेच इतर स्वरूपाचे अनेक आर्थिक व्यवहार करण्यासाठी येनापूर परिसरातील लोकांची मुख्य बँक ...

Poor management of Bank of India Yenapur branch | बँक ऑफ इंडिया येनापूर शाखेचा ढिसाळ कारभार

बँक ऑफ इंडिया येनापूर शाखेचा ढिसाळ कारभार

संजय गांधी निराधार योजना व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, तसेच इतर स्वरूपाचे अनेक आर्थिक व्यवहार करण्यासाठी येनापूर परिसरातील लोकांची मुख्य बँक येनापूर येथे आहे. त्यामुळे या बँकेत नेहमीच वर्दळ राहते. मात्र, इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची गैरसोय होत असून ग्राहकांमध्ये मोठा रोष दिसून येत आहे. गैरसोयीच्या बाबतीत, तसेच ग्राहकांशी असहयोगाचे भाव प्रदर्शित करण्यात येनापूर येथील बँक ऑफ इंडिया नेहमी चर्चेत राहते. सध्या उन्हाचा पारा हा ४० अंशांवर जाताना दिसतोय, त्यामुळे आबालवृद्ध लोकांची येथे गर्दी आहे.

उन्हाचा विचार करता येथे पाण्याची सोय नाही. बैठकीची व्यवस्था नाही, अथवा सावलीकरितादेखील कोणत्याही स्वरूपाची येथे सोय नाही. मात्र, बँकेतील कर्मचारी एसीच्या खोलीत निवांत काम करीत आहेत. यामुळे येथील ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी बँक व्यवस्थापनाने नागरिकांची सोय करावी, अन्यथा बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

Web Title: Poor management of Bank of India Yenapur branch