सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST2021-04-18T04:36:23+5:302021-04-18T04:36:23+5:30

कोंढाळा येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या शौचालयाची अत्यंत दैनावस्था झाली असल्याने गावातील नागरिकांना उघड्यावरच शाैचविधी उरकावा लागत ...

Poor condition of public toilets | सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

कोंढाळा येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या शौचालयाची अत्यंत दैनावस्था झाली असल्याने गावातील नागरिकांना उघड्यावरच शाैचविधी उरकावा लागत आहे. या पाचही शौचालयांचे दरवाजे समाजकंटकांनी तोडफोड केली. तसेच पाणी उपलब्ध नसल्याने दैनावस्था झाली आहे त्यामुळे त्याचा वापर होत नाही. सार्वजनिक शौचालयाजवळ नळ कनेक्शन होते आणि पाणी येणं बंद झाले असल्याने शौचालयाची बिकट अवस्था होऊ लागली. सार्वजनिक शौचालयापासून दुर्गंधी, तर चौकात मुत्रीघर याची दुर्गंधी येत असते. याकडे लक्ष घालून महिन्यातून एकदा तरी स्वच्छ करावी, दुर्गंधी पसरणार याची दखल घेत ग्रामपंचायतने लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बहुतांश नागरिकांच्या घरी शौचालय आहे आणि सार्वजनिक शौचालयाचा फारच कमी नागरिक वापर करत असतात, पण शौचालयाच्या दुरवस्थेमूळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उपसरपंच गजानन सेलोटे यांनी दिली.

Web Title: Poor condition of public toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.