पाणंद रस्त्याची दुरवस्था; शेतकऱ्यांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:44 IST2021-09-08T04:44:05+5:302021-09-08T04:44:05+5:30
पाणंद रस्ता तयार होऊन पाच वर्षे झाले; पण अजूनपर्यंत मुरुम टाकण्यात आला नाही. सन २०१४-१५ या वर्षात नंदकिशोर खोब्रागडे ...

पाणंद रस्त्याची दुरवस्था; शेतकऱ्यांची अडचण
पाणंद रस्ता तयार होऊन पाच वर्षे झाले; पण अजूनपर्यंत मुरुम टाकण्यात आला नाही. सन २०१४-१५ या वर्षात नंदकिशोर खोब्रागडे ते अंताराम उसेंडी यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पाणंद रस्त्याचे माती काम झाले. परिसरातील २५ ते ३० शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी हा एकमेव पाणंद रस्ता आहे. जेव्हापासून या पाणंद रस्त्याचे माती काम झाले तेव्हापासून अजूनपर्यंत मुरमाचे काम झाले नाही. पाणंद रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी अडचण होत आहे. शेतीचे साहित्य बैलगाडी, ट्रॅक्टर खरीप हंगामात पोहोचवणे अडचणीचे झाले आहे. पाणंद रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गजानन धनकर, बाळकृष्ण मेहरे, उद्धव मानकर, सुधाकर दुमाने, तुळशीराम चाग व शेतकऱ्यांनी केली आहे.
060921\0734img-20210831-wa0028.jpg
फोटो.. पांदन रस्त्यावरील खड्डे दाखवताना शेतकरी