शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

झटपट नोकरीसाठी पॉलिटेक्निक; विद्यार्थ्यांचा ओढा 'कॉम्प्युटर'कडे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 15:40 IST

मुदतवाढीमुळे नोंदणी वाढली : पाच वर्षांत सहाशेवर विद्यार्थ्यांना रोजगार

न्यूज अपडेटस्लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. अशावेळी मुलांनी कोणते शिक्षण घ्यावे, असा प्रश्न पालकांसमोर असतो. इयत्ता दहावी व बारावीनंतर अनेक विद्यार्थी पदवीचे शिक्षण न घेता पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतात. मागील पाच वर्षांत गडचिरोली येथे पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या सहाशेवर विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्त झालेली आहे.

गडचिरोलीतील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आठ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाकडील ओढा कमी झाला होता; परंतु शासकीय तंत्रनिकेतनने 'स्कूल कनेक्ट' प्रोग्राम शाळांमध्ये राबवून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. सध्या विद्यार्थ्यांचा ओढा संगणक शाखेकडे सर्वाधिक आहे.

२१० जागांसाठी ६१५ विद्यार्थ्यांनी केली नोंदणीगडचिरोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एकूण २१० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. एकूण चार शाखांसाठी आतापर्यंत ६१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. नोंदणीचा आकडा पुन्हा वाढू शकतो.

जुलैपर्यंत करता ९ चारयजपॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज सादर करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) कडून मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना ९जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

अंतिम यादीनंतर प्रवेश निश्चितकागदपत्रे पडताळणी, अर्ज निश्चितीची प्रक्रिया यादरम्यान पूर्ण करता येणार आहे. 'कॅप'साठी पर्याय अर्ज भरणे, कॅप जागावाटप, जागा स्वीकृती करणे, उमेदवारांचे वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे, अंतिम गुणवत्ता यादीनंतर जाहीर केला जाणार आहे.

१६ जुलैला अंतिम यादी विद्यार्थ्यांना ९ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. कागदपत्र पडताळणी व अर्ज निश्चिती होईल. तात्पुरती गुणवत्ता यादी ११ जुलैला प्रसिद्ध होईल. आक्षेप पडताळणी- नंतर तसेच १६ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.

कोणत्या शाखेच्या किती जागा?शाखा                      जागासंगणक                      ३०सिव्हील                      ६०इलेक्ट्रिकल                 ६०मेकॅनिकल                  ६०एकूण                         २१०

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना हमखास प्लेसमेंट मिळून रोजगाराची संधी उपलब्ध होते. दर्जेदार व उपयोगी शिक्षण व स्कूल कनेक्ट कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ओढा तंत्रशिक्षणाकडे वाढलेला आहे. - डॉ. अतुल बोराडे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीGadchiroliगडचिरोली