प्रदूषणमुक्त दिवाळीचा केला संकल्प
By Admin | Updated: November 11, 2015 00:49 IST2015-11-11T00:49:05+5:302015-11-11T00:49:05+5:30
मोठ्या आवाजाच्या फटाके फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी व वायू प्रदूषण होतो.

प्रदूषणमुक्त दिवाळीचा केला संकल्प
अंनिसचा पुढाकार : फटाक्यावरील खर्चात दोन लाखांची केली विद्यार्थ्यांनी बचत
गडचिरोली : मोठ्या आवाजाच्या फटाके फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी व वायू प्रदूषण होतो. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. या दिवाळी सणाच्या परंपरेला फाटा देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गडचिरोलीने जिल्हाभरात जनजागृती करून शाळांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा सल्ला दिला. या उपक्रमात गडचिरोली व चामोर्शी तालुक्यातील २१ शाळांनी सहभाग दर्शवून फटाक्यावर होणाऱ्या दोन लाख रूपयांच्या खर्चात विद्यार्थ्यांनी बचत केली, अशी माहिती अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या उपक्रमात गडचिरोली शहरातील राणी दुर्गावती कन्या विद्यालय, जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल, वसंत विद्यालय, जि. प. हायस्कूल, विद्याभारती कन्या हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, संत गाडगेबाबा हायस्कूल, महात्मा गांधी विद्यालय मुरखळा (नवेगाव) तसेच सिंधूताई पोरेड्डीवार हायस्कूल गोगाव, वियाणी विद्यानिकेतन हायस्कूल नवेगाव, विद्याभारती हायस्कूल आंबेशिवणी, गोविंदराव हायस्कूल खरपुंडी, प्रियंका हायस्कूल धानोरा, चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील राजे धर्मराव हायस्कूल, भगवंतराव हायस्कूल ठाकरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा आष्टी, महात्मा जोतिबा फुले आष्टी, जि.प. प्राथमिक शाळा मार्र्कंडा (कं.), थापर विद्यानिकेतन हायस्कूल आष्टी, शिशूमंदिर कॉन्व्हेंट आष्टी, लिटल आर्ट पब्लिक हायस्कूल आष्टी आदी २१ शाळांनी सहभाग दर्शविला. सहभागी शाळांना संघटनेमार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती अंनिसचे सचिव पी. बी. ठाकरे, कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे यांनी दिली.