शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मध्येच बोलले...
2
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
3
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
4
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
5
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
6
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
7
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
8
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
9
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
10
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
11
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
12
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
13
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
14
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
15
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
16
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
17
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
18
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
19
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
20
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी

पोलिसांचा दारूविक्रेत्यांवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:57 AM

होळी व धुलीवंदनाचा सण बुधवार-गुरूवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. होळीच्या पाडव्याला दारू प्राशन करून धुळवड खेळण्याकडे बहुतांश लोकांचा कल राहात असल्याने अनेकजण दोन दिवसांपूर्वीपासूनच मद्याची व्यवस्था करण्याच्या तयारीत लागले होते.

ठळक मुद्देअधिकारीही सतर्क : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी व बंदोबस्तात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : होळी व धुलीवंदनाचा सण बुधवार-गुरूवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. होळीच्या पाडव्याला दारू प्राशन करून धुळवड खेळण्याकडे बहुतांश लोकांचा कल राहात असल्याने अनेकजण दोन दिवसांपूर्वीपासूनच मद्याची व्यवस्था करण्याच्या तयारीत लागले होते. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारूला रोख लावण्यासाठी पोलीस विभाग सतर्क झाला आहे.जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारूविक्रीच्या विरोधात रोखठोक भूमिका घेऊन आहेत. तसे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून निर्देशही आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कोणकोणत्या छुप्या मार्गाने दारूची आयात केली जाते. कोणत्या वेळेत दारूची आयात होते, याबाबतची सर्व माहिती ठेवून दारूला रोख लावण्यासाठी कृती कार्यक्रमही आखण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावर नाकाबंदी केली जात आहे. अहेरी उपविभागातही सर्वच मुख्य मार्गावर पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे. या नाकाबंदीदरम्यान आवागमन करणारी दुचाकी, चारचाकी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे दारूविक्रेतेही आता दुसऱ्या पर्यायी मार्गाच्या शोधात निघाले असल्याचे बोलले जात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून प्रक्रिया सुरू आहे. या काळात या काळात लोकांना सणानिमित्त दारू पुरविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांची राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरही नजर आहे. एकूणच पोलीस विभाग कमालीचा सतर्क झाला आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना चापलोकसभा निवडणूक व होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील वाहतूक पोलीस शाखाही सतर्क झाली आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, देसाईगंजसह अहेरी उपविभागातही वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहनांची तपासणी केली जात आहे. गेल्या आठवडाभरपासून ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक व चारही मुख्य मार्गावर वाहनधारकांना अडवून त्यांच्यावर कायदेशिर कारवाई केली जात आहे. परिणामी काही वाहनधारक धास्तावले आहेत.मोहफूल खरेदी-विक्री व्यवहारावरही करडी नजरगडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून जंगलात मोहफुलाचे झाड मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय गावालगत शेतशिवार तसेच मोकळ्या परिसरात मोहफुलाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या मोहफूल वेचणीचा हंगाम जोमात सुरू आहे. घरगुती कामासाठी तसेच जनावरांसाठी मोहफुलाचा वापर केल्यास हरकत नाही. मात्र सदर मोहफुलापासून दारू गाळून ती विक्री करण्यास बंदी आहे. तरीसुद्धा गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात मोहफूल दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोहफुलाचा साठा करून ठेवणे, त्याची विक्री करणे, दारू गाळणे या प्रकारावर पोलीस विभागाची करडी नजर आहे.

टॅग्स :Waterपाणी