अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ
By Admin | Updated: March 12, 2015 02:05 IST2015-03-12T02:05:14+5:302015-03-12T02:05:14+5:30
वैरागड गावातील अवैध धंद्यांना या भागातील पोलिसांचेच पाठबळ आहे. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अवैध धंद्यांना आळा घालावा,

अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ
वैरागड : वैरागड गावातील अवैध धंद्यांना या भागातील पोलिसांचेच पाठबळ आहे. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणीचे निवेदन तंटामुक्त गाव समिती, भंडारेश्वर देवस्थान समिती व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
३ मार्च २०१५ रोजी वैरागड येथील तीन युवकांनी पांडव देवाच्या दर्शनासाठी आलेल्या कुरखेडा तालुक्यातील अंगारा येथील महिलांना असभ्य वागणूक दिली. या घटनेची तक्रार संबंधित महिलांनी आरमोरी पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीनंतर चार दिवस उलटूनही आरमोरी पोलिसांनी युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली नाही. एसडीपीओ डॉ. राहूल खाडे यांना पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनी केल्यानंतर पोलीस निरीक्षक मोरे यांनी चवथ्या दिवशी या प्रकरणातील आरोपींना अटक केली. या प्रकरणी दिशा ठरविण्यासाठी वैरागड येथे ग्रामपंचायतीच्या सभागृहात तंटामुक्त समिती, भंडारेश्वर देवस्थान समिती व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. वैरागडातील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी सरपंच सेवानंद सहारे, उपसरपंच प्रमोद तावेडे, तंमुस अध्यक्ष जगदीश मेश्राम, पोलीस पाटील भानारकर, श्रावण नागोसे, मुखरू खोब्रागडे, महादेव दुमाने यांनी निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)