प्रामाणिकपणा जपून पोलीसपाटलांनी कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:42+5:302021-09-05T04:41:42+5:30
कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर देडे यांचे स्थानांतरण धानोरा पोलीस स्टेशनमध्ये झाले आहे. त्याबद्दल शनिवारी महाराष्ट्र गाव कामगार पोलीसपाटील ...

प्रामाणिकपणा जपून पोलीसपाटलांनी कार्य करावे
कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर देडे यांचे स्थानांतरण धानोरा पोलीस स्टेशनमध्ये झाले आहे. त्याबद्दल शनिवारी महाराष्ट्र गाव कामगार पोलीसपाटील संघटना तालुका शाखेच्या वतीने पोलीस स्टेशनच्या इमारतीत निरोप समारंभ व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुधाकर देडे बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक देवराव भांडेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सिराज पठाण, पोलीसपाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष योगराज नाकाडे, सचिव विश्वनाथ रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष प्रेमदास पंधरे, पोलीसपाटील राजेंद्र आकरे, चोखोबा साखरे, देवेंद्र लाडे, मनोज सहारे, यशोधरा नंदेश्वर तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीसपाटील उपस्थित होते. पोलीसपाटील कुंडलिक नैताम यांनी कार्यक्रमाचे संचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
040921\img_20210904_153901.jpg~040921\img_20210904_153948.jpg~040921\img-20210904-wa0168.jpg
सत्कार कार्यक्रमात उपस्थीत ठाणेदार सूधाकर देडे पोलीस उपनिरीक्षक देवराव भांडेकर~ठाणेदार सूधाकर देडे यांचा सत्कार करताना महीला पोलीस पाटील~मार्गदर्शन करताना ठाणेदार सूधाकर देडे