पोलिसांनी केली एक लाख रूपयांची दारू जप्त
By Admin | Updated: April 5, 2016 03:51 IST2016-04-05T03:51:32+5:302016-04-05T03:51:32+5:30
देसाईगंज पोलिसांनी कुरखेडा मार्गावर ६० हजार रूपये किमतीची दारू व ३ लाख रूपये किमतीचे वाहन

पोलिसांनी केली एक लाख रूपयांची दारू जप्त
देसाईगंज/गडचिरोली : देसाईगंज पोलिसांनी कुरखेडा मार्गावर ६० हजार रूपये किमतीची दारू व ३ लाख रूपये किमतीचे वाहन सोमवारी पकडले. या कारवाईत उमेश मनोहर साखरे (२७) रा. व्याहाड खुर्द ता. सावली, जि. चंद्रपूर या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकाच्या पथकानेही ४३ हजारांचा माल जप्त केला आहे.
कुरखेडाकडून देसाईगंजकडे पांढऱ्या रंगाची मारोती कार एमएच ३१- एच- ७२३५ ने अवैधरित्या देशी दारू येत असल्याची माहिती देसाईगंज पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार दिलीप बोडे, भाऊराव मेश्राम, राजू पुराम, सचीन अतकरे यांनी पाळत ठेवत ही कारवाई पार पाडली. एकूण ३ लाख ६० हजारांचा माल जप्त करण्यात आला. आरोपीच्या विरोधात देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षकाच्या पथकाने आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा येथील इंदिरा मोहुर्ले या महिलेकडून ४३ हजार रूपयांचे मोहफूल जप्त केले आहते. (लोकमत न्यूज नेटवर्क)