पोलीस, राजस्व व वन विभागाचे काम करणाऱ्यांना धडा शिकवू
By Admin | Updated: April 23, 2015 01:33 IST2015-04-23T01:33:28+5:302015-04-23T01:33:28+5:30
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस, वन व राजस्व विभागासाठी काम करणारे तसेच त्यांना मदत करणारे यांना सजा दिली जाईल,...

पोलीस, राजस्व व वन विभागाचे काम करणाऱ्यांना धडा शिकवू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पोलीस, वन व राजस्व विभागासाठी काम करणारे तसेच त्यांना मदत करणारे यांना सजा दिली जाईल, अशी धमकी अहेरी एरिया कमिटी भाकपा माओवादी संघटनेने दिली आहे. अहेरी तालुक्यात कमलापूर परिसरात माओवाद्यांनी टाकलेल्या पत्रकात त्यांनी सदर बाब नमूद केली आहे. दामरंचाचा उपसरपंच पत्रू दुर्गे मागील पाच वर्ष सरपंच राहून गावात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार केला. पोलीस प्रशासनाला मदत करून जनविरोधी धोरण चालवित होता. फॉरेस्ट बिल्डिंग बांधण्यासाठीही मदत केली. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार करण्यात यावा, जनतेच्या मूलभूत समस्या सोडविल्या जात नाही. भ्रष्ट व शोषणकारी व्यवस्था उद्ध्वस्त करा व क्रांतिकारी सरकार स्थापन करा, भूमीअधिग्रहण कायद्याची गरज नसून क्रांतिकारी भूमिसुधार आवश्यक असल्याचे माओवादी संघटनेने म्हटले आहे. २५ एप्रिल ते १ मे या कालावधीत भूमीअभिलेख कायद्याच्या विरोधात संघर्ष सप्ताह साजरा करण्याचे आवाहन माओवाद्यांनी केले आहे. भूमकाल संघटनेचे सचिव दत्ता शिर्के, अरविंद सोवणी पोलीस प्रशासनाचे एजंट आहे. हे दोघे जनक्रांतीवर पाणी फेरण्याचे काम करीत आहे.