पोलीस भरतीला प्रारंभ
By Admin | Updated: March 30, 2016 01:38 IST2016-03-30T01:38:15+5:302016-03-30T01:38:15+5:30
गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा असून तेथे पोलीस शिपाई पदासाठी ८२ जागांची भरती प्रक्रिया मंगळवारपासून पोलीस कवायत मैदानावर प्रारंभ झाली आहे.

पोलीस भरतीला प्रारंभ
गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा असून तेथे पोलीस शिपाई पदासाठी ८२ जागांची भरती प्रक्रिया मंगळवारपासून पोलीस कवायत मैदानावर प्रारंभ झाली आहे. पहिल्या दिवशी किमान ५०० उमेदवारांनी भरती प्रक्रियेत दौड लावली. तसेच अनेक उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. या भरती प्रक्रियेवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल बाबर आदीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी जातीने लक्ष ठेवून आहेत. परिसरात सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आली आहे.