मोहफुलांच्या हातभट्टीवर पोलिसांची धाड

By Admin | Updated: September 16, 2015 02:00 IST2015-09-16T02:00:36+5:302015-09-16T02:00:36+5:30

तालुक्यातील पुराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोशीटोला भागात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू काढल्या जात असल्याची गुप्त माहिती...

Police raid on Mohphula's hammer | मोहफुलांच्या हातभट्टीवर पोलिसांची धाड

मोहफुलांच्या हातभट्टीवर पोलिसांची धाड

११० लिटर दारू जप्त : पुराडा पोलिसांची कारवाई
कुरखेडा : तालुक्यातील पुराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोशीटोला भागात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू काढल्या जात असल्याची गुप्त माहिती पुराडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज महाजन यांना मिळाली. या माहितीच्या आधारे महाजन व पोलीस कर्मचाऱ्यांनी जोशीटोला जंगल परिसरात हातभाट्टीवर धाड टाकून एका दारूविक्रेत्या आरोपींकडून ११० लिटर मोहफुलाची दारू व साहित्य जप्त केल्याची घटना सोमवारी घडली.
यासंदर्भात दारूविक्रेता आरोपी परसराम केवलसिंह नैताम (५०) रा. जोशीटोला याचेवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये पुराडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी परसराम नैताम याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Police raid on Mohphula's hammer