पोलीस जवानांना बांधल्या राख्या

By Admin | Updated: August 31, 2015 01:10 IST2015-08-31T01:10:49+5:302015-08-31T01:10:49+5:30

जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त महिला व विद्यार्थिनींनी पोलीस व सीआरपीएफ जवानांना राख्या बांधून बंधूभावाचा संदेश दिला.

Police personnel were tied | पोलीस जवानांना बांधल्या राख्या

पोलीस जवानांना बांधल्या राख्या

महिला व विद्यार्थिनींचा पुढाकार : गडचिरोली व अहेरीत उपक्रम
गडचिरोली : जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त महिला व विद्यार्थिनींनी पोलीस व सीआरपीएफ जवानांना राख्या बांधून बंधूभावाचा संदेश दिला.
गडचिरोली - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस ठाणे, सीआरपीएफ कॅम्प व मूकबधिर विद्यालयात पोलीस जवान व शालेय विद्यार्थ्यांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी प्रा. मुनघाटे, जिल्हा संयोजक सुभाष उप्पलवार, नगरमंत्री हर्षल गेडाम, कुणाल मानकर, वैष्णवी डोंगरे, प्राची भृगवार, करिश्मा गेडाम, सोनाली पंद्रे, पल्लवी नरोटे, मनू मशाखेत्री व कार्यकर्ते उपस्थित होते. एकूण २५० बांधवांना राख्या बांधण्यात आल्या.
अहेरी - अहेरी पोलीस ठाणे व धर्मराव हायस्कूल लगाम यांच्या संयुक्त विद्यमाने प्राणहिता कॅम्पमध्ये जवानांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, ठाणेदार संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोळुंके, किरण दीडवार उपस्थित होते. दरम्यान प्रणय अशोक यांनी मार्गदर्शन केले. संचालन धनराज दुर्गे तर आभार सोळुंके यांनी मानले. तसेच मद्दिवार शाळेच्या वतीने पोलीस कॅम्पमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गणेश पवार, गजानन पाटील, संतोष जोशी उपस्थित होते. रक्षाबंधन कार्यक्रमातून सामाजिक समता, बंधुत्वाचा संदेश देण्यात आला.

Web Title: Police personnel were tied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.