पोलिसांनी केले विस्फोटक निष्क्रीय
By Admin | Updated: October 16, 2014 23:24 IST2014-10-16T23:24:44+5:302014-10-16T23:24:44+5:30
आलापल्ली मार्गावर नक्षल्यांनी पोलिंग पार्टीच्या गाडीला उडविण्याच्या उद्देशाने लावलेले विस्फोटक पोलीस पथकाने नष्ट केले आहे.

पोलिसांनी केले विस्फोटक निष्क्रीय
एटापल्ली : आलापल्ली मार्गावर नक्षल्यांनी पोलिंग पार्टीच्या गाडीला उडविण्याच्या उद्देशाने लावलेले विस्फोटक पोलीस पथकाने नष्ट केले आहे.
सदर कार्यवाही आज करण्यात आली. आलापल्ली- एटापल्ली मार्गावर नक्षलवाद्यांनी २० किलो स्फोटके लावले होते. या मार्गावरून मतदान आटोपून येणाऱ्या पोलीस पथक व मतदान कर्मचाऱ्यांना घातपात घडविण्याच्या दृष्टीने सदर कृत्य नक्षलवाद्यांनी केले. मात्र गस्तीवरील पोलिसांच्या दक्षतेमुळे विस्फोटकाचा साठा नष्ट करण्यात यश आले आहे. व दुर्गम भागातील मतदान केंद्रावरून पोलिंग पार्ट्या सुखरूपपणे मुख्यालयात पोहोचविण्यात आल्या आहेत. या विस्फोटकामुळे वाहन उडविले जाण्याची शक्यता होती. अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. विस्फोटक नष्ट करण्याची कार्यवाही सुरू असल्यामुळे आलापल्ली- एटापल्ली मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प करण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)