पोलिसांच्या मध्यस्थीने प्रेमीयुगूल विवाहबद्ध
By Admin | Updated: November 29, 2015 02:18 IST2015-11-29T02:18:22+5:302015-11-29T02:18:22+5:30
मुलाच्या कुटुंबीयांचा लग्नास विरोध असताना पोलिसांची मध्यस्थी व महिला तक्रार निवारण समितीच्या पुढाकाराने शनिवारी अहेरी येथे प्रेमीयुगुलांचा विवाह सोहळा पार पडला.

पोलिसांच्या मध्यस्थीने प्रेमीयुगूल विवाहबद्ध
अहेरीतील मंदिरात सोहळा : महिला तक्रार निवारण समितीचा पुढाकार
अहेरी : मुलाच्या कुटुंबीयांचा लग्नास विरोध असताना पोलिसांची मध्यस्थी व महिला तक्रार निवारण समितीच्या पुढाकाराने शनिवारी अहेरी येथे प्रेमीयुगुलांचा विवाह सोहळा पार पडला.
तालुक्यातील नवेगाव येथील रूपेश श्यामराव शेंडे (२९) व परिसरातील वेलगूर येथील उषा तुकाराम राऊत (२७) यांचे तीन वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. मुलाच्या कुटुंबीयांचा लग्नास विरोध होता. त्यामुळे उषा हिने पोलीस ठाण्यात तक्रार निवारण समितीकडे साकडे घातले. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय मोरे, डॉ. नीलिमा सिंह, सहाय्यक फौजदार भगवान करमरकर यांनी उमेश व त्याच्या आईवडिलांची समजूत घातली. त्यानंतर कुटुंबीय लग्नसोहळ्याला राजी झाले. शनिवारी मानवदयाल मंदिरात विवाह सोहळा पार पडला. यावेळी जि. प. सदस्य नंदा दुर्गे, पुरूषोत्तम मडावी, वेलगुरचे पोलीस पाटील मनोहर चालुरकर, नवेगावचे पोलीस पाटील प्रभाकर शेंडे तसेच उमेश व उषाचे कुटुंबीय हजर होते. (प्रतिनिधी)