मुरूमगावात पोलिसांची आरोग्य तपासणी
By Admin | Updated: May 8, 2015 01:36 IST2015-05-08T01:36:35+5:302015-05-08T01:36:35+5:30
मुरूमागाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने पोलीस जवानांसाठी बुधवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

मुरूमगावात पोलिसांची आरोग्य तपासणी
धानोरा : मुरूमागाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने पोलीस जवानांसाठी बुधवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ७० पोलीस जवानांची आरोग्य तपासणी करण्यात आली
यावेळी आयोजित शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून मुरूमगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी सचिन गडवे उपस्थित होते. जवानांची वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास कुमरे यांनी तपासणी केली. तपासणीनंतर प्रकृती बिघडलेल्या काही जवानांवर औषधोपचारही केले. मुरूमगाव हा अत्यंत दुर्गम व नक्षलदृष्ट्या संवेदनशील भाग आहे. त्यामुळे येथील पोलीस जवानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधीकधी पोलिसांचे आरोग्य बिघडण्याचा धोकाही निर्माण होते. याबाबी लक्षात घेऊन पोलीस मदत केंद्रात जिल्हा पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ पोलीस जवानांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस मदत केंद्राचे जवान, सीआरपीएफचे असिस्टंट कमान्डंट, स्वातंत्र्य कुमार, आरोग्य विभागातील कर्मचारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)