वेडसर मुलीच्या उपचारासाठी पोलिसांनी केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:40 IST2021-09-22T04:40:42+5:302021-09-22T04:40:42+5:30
गुड्डीगुडम: उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला हद्दीतील गाेलाकर्जी येथील माया शंकर चेन्नम (२०) ही वेडसर मुलगी आहे. तिच्या उपचारासाठी राजाराम ...

वेडसर मुलीच्या उपचारासाठी पोलिसांनी केली मदत
गुड्डीगुडम: उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला हद्दीतील गाेलाकर्जी येथील माया शंकर चेन्नम (२०) ही वेडसर मुलगी आहे. तिच्या उपचारासाठी राजाराम खांदला पाेलिंसानी सुमारे पाच हजार रुपयांची मदत केली आहे.
मायावर सिकंदराबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काेराेनाच्या कालावधीत उपचार अर्ध्यावरच साेडून तिला परत यावे लागले. माया ही गोलकरजी परिसरात रस्त्यावरून फिरत राहते . ही बाब राजाराम पोलिसांना माहीत झाली. त्यांनी मायाच्या उपचारासाठी ५ हजार १०० रुपयांची मदत. उपपोलीस स्टेशचे प्रभारी अधिकारी रविंद्र भोरे, पोउपनी विजय कोल्हे, गणेश कड, केशव केंद्रे , वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश मानकर, औषध निर्माण अधिकारी नितीन धकाते , जिल्हा पोलीस व SRPF चे अंमलदार हजर होते.