पोलीस विभागाने केला व्यसनमुक्तीचा संकल्प

By Admin | Updated: March 4, 2017 01:16 IST2017-03-04T01:16:08+5:302017-03-04T01:16:08+5:30

जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले जवान व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस विभागाच्या मार्फतीने

Police Department has decided to get rid of addiction | पोलीस विभागाने केला व्यसनमुक्तीचा संकल्प

पोलीस विभागाने केला व्यसनमुक्तीचा संकल्प

१७ व्यसनमुक्त कर्मचाऱ्यांचा केला सत्कार : पोलीस मुख्यालयात कार्यशाळा
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले जवान व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस विभागाच्या मार्फतीने व्यसनमुक्तीचे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या संकल्पमुक्तीचा शुभारंभ जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आला.
या कार्यशाळेला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, १९२ बटालियन सीआरपीएफचे कमांडंट मनोजकुमार, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, सर्च फाऊंडेशनचे उप संचालक तुषार खोरगडे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आरती बंग, डॉ. योगेश पडोळे आदी मान्यवर उपस्थित होते. जानेवारी महिन्यात संकल्पमुक्तीचा पहिला सत्र घेण्यात आला. या सत्रात जिल्हा पोलीस व सीआरपीएफचे २५ जवान सहभागी झाले होते. त्यापैकी १७ कर्मचाऱ्यांनी स्वत:ला व्यसनमुक्त केले आहे. सत्र क्रमांक २ मध्येही जवानांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रथम सत्रामध्ये व्यसनमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शरीर सशक्त व निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक जवानाने व्यसनांपासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार, संचालन पोलीस उपनिरिक्षक तेजस्वी पाटील, तर आभार विनोद पांडे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)
 

Web Title: Police Department has decided to get rid of addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.