गडचिरोलीत नक्षल दलमशी पोलिसांची चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 09:37 IST2020-09-14T09:37:19+5:302020-09-14T09:37:38+5:30
जंगलात असलेल्या नक्षलवाद्यांच्या एका दलमशी गडचिरोली पोलिसांची रविवारी चकमक उडाली. यात कोणीही जखमी झाले नसले तरी नक्षलवाद्यांचे काही साहित्य पोलिसांच्या हाती लागले.

गडचिरोलीत नक्षल दलमशी पोलिसांची चकमक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जंगलात असलेल्या नक्षलवाद्यांच्या एका दलमशी गडचिरोली पोलिसांची रविवारी चकमक उडाली. यात कोणीही जखमी झाले नसले तरी नक्षलवाद्यांचे काही साहित्य पोलिसांच्या हाती लागले. कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील लव्हारीच्या जंगलात ही चकमक झाली. पोलिसांच्या सी-६० पथकाचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. यावेळी नक्षलवाद्यांचे पिट्टू, पुस्तके आणि काही स्वयंपाकाचे साहित्य पोलिसांच्या हाती लागले. त्यावरून पळून गेलेले नक्षलवादी कोरची दलमचे असण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविली.