पोलिसांनी केली असहाय वृद्धाच्या जेवनाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:58+5:302021-05-05T04:59:58+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शनिवार व रविवार दोन दिवस शहरात पूर्ण संचारबंदी आहे. येथील बाजारपेठेत दोन दिवसांपासून एक वृद्ध भटकंती करीत ...

The police arranged a meal for the helpless old man | पोलिसांनी केली असहाय वृद्धाच्या जेवनाची व्यवस्था

पोलिसांनी केली असहाय वृद्धाच्या जेवनाची व्यवस्था

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शनिवार व रविवार दोन दिवस शहरात पूर्ण संचारबंदी आहे. येथील बाजारपेठेत दोन दिवसांपासून एक वृद्ध भटकंती करीत असल्याचे येथील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आले. त्यांनी त्याची आस्थेने विचारपूस केल्यावर तो भंडारा जिल्ह्यातील वाकल येथील रहिवासी असून, चुकीने या गावात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले; मात्र संचारबंदीमुळे दोन दिवसांपासून परत जाण्याकरिता कोणतेच वाहन मिळत नसल्याने त्याची भटकंती सुरू हाेती. कोरोनामुळे अनोळखी माणसाला कुणीच जवळ करीत नसल्याने त्याची उपासमार होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मानवी दृष्टिकोणातून वाहतूक हवालदार मधुकर बारसागडे, गृहरक्षक दलाचे मच्छीन्द्र जनबंधू, प्रभाकर लाडे, प्रेमराज दोनाडकर यांनी गावातील मेसमधून जेवनाचा डब्बा आणत त्याची व्यवस्था केली. सोमवारला वडसा येथील मालवाहक वाहन येथे आल्यावर त्याला त्या वाहनात बसवत देसाईगंजपर्यंत सोडण्यात आले.

Web Title: The police arranged a meal for the helpless old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.