नांगरणी करायची? मग माेजा प्रतितास ९०० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST2022-05-26T05:00:00+5:302022-05-26T05:00:29+5:30

शेतकरी पाऊस येण्याच्या अगोदर शेतजमिनी नांगरणी करून ठेवत असतात. नांगरणी केलेली शेतजमीन पिकांसाठी लाभदायक असते. त्यामुळे शेतकरी शेतजमीन नांगरणी करीत असतात. सध्या शेतशिवारात ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसून येत आहेत. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात असत. अलीकडे शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून शेतातील हंगामी स्वरुपात येणारी कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत. ट्रॅक्टरसुद्धा गावागावात दिसून येत आहेत.

Plow? Then Maeja Rs 900 per hour | नांगरणी करायची? मग माेजा प्रतितास ९०० रूपये

नांगरणी करायची? मग माेजा प्रतितास ९०० रूपये

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मान्सूनपूर्ण  पावसामुळे शेतजमिनीत थोडा ओलसरपणा आला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात यासाठी लागणारे ट्रॅक्टर भाडे प्रतितास ९०० रुपये घेतले जात असून गतवर्षीपेक्षा  १०० रुपयांनी वाढ झाली आहे. काही ट्रॅक्टर मालक प्रतितास ९५० रुपये भाडे घेत असल्याचे दिसून येत आहे. 
शेतकरी पाऊस येण्याच्या अगोदर शेतजमिनी नांगरणी करून ठेवत असतात. नांगरणी केलेली शेतजमीन पिकांसाठी लाभदायक असते. त्यामुळे शेतकरी शेतजमीन नांगरणी करीत असतात. सध्या शेतशिवारात ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसून येत आहेत. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात असत. अलीकडे शेतकरी बैलजोडी वापरणे बंद करून शेतातील हंगामी स्वरुपात येणारी कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत. ट्रॅक्टरसुद्धा गावागावात दिसून येत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना गावात हंगामी स्वरुपात रोजगार उपलब्ध झाला आहे.
धान पिकासोबतच कपाशी पिकाची लागवडसुद्धा शेतकरी करीत असतात. मृगाचा अपेक्षित पाऊस झाला तर लागवड करणे सोयीचे होत असते. त्यामुळे कपाशी लागवड करणाऱ्या शेतजमिनीत नांगरणी केली जात आहे. दरवर्षी काही शेतकरी जमीन भाड्याने घेऊन शेती करीत होते;मात्र शेतीची मशागत, पीक लागवड, बी- बियाणे, कापणी, मळणी, खर्च वाढत चालला असल्याने भाड्याने शेतजमीन करण्यास शेतकरी कानाडोळा करीत आहेत. मागील वर्षीपेक्षा डिझेलच्या दरात ६० ते ७० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसत चालला आहे.
शेती व्यवसायाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अधिक शेती असणारे बरेच शेतकरी आपली अर्धीअधिक शेती दुसऱ्यांना भाडेतत्त्वावर देत आहेत. १० एकरपैकी २ एकर स्वत: करायची व ८ एकर शेती ठेक्याने मशागत व पीक लागवडीसाठी द्यायची, असा प्रकार ग्रामीण भागात सुरू आहे. 

शेतजमीन स्वच्छतेवर भर 
-    गडचिराेली जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. सध्या प्रचंड तापमान असल्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर सकाळच्या सुमारास शेतावर जाऊन शेताची स्वच्छता करीत आहेत. काडीकचरा जाळणे, पाळे स्वच्छ करणे, काटेरी झुडपांची ताेड करणे आदी कामे सुरू आहेत. जून महिन्यात पहिला पाऊस झाल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला सुरुवात हाेणार आहे.

 

Web Title: Plow? Then Maeja Rs 900 per hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती