सुकाळा फाट्यावरील प्रवाशी निवाऱ्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST2021-04-22T04:37:54+5:302021-04-22T04:37:54+5:30
वैरागड : वैरागड-देलनवाडी मार्गावरील मोहझरी जवळील सुकाळा या फाट्यावर मागील १५ वर्षांपूर्वी प्रवासी निवारा बांधण्यात आला होता. पण निकृष्ट ...

सुकाळा फाट्यावरील प्रवाशी निवाऱ्याची दुर्दशा
वैरागड : वैरागड-देलनवाडी मार्गावरील मोहझरी जवळील सुकाळा या फाट्यावर मागील १५ वर्षांपूर्वी प्रवासी निवारा बांधण्यात आला होता. पण निकृष्ट बांधकामामुळे हा प्रवासी निवारा अल्पावधीत नष्ट झाला आता प्रवाशांना झाडाच्या आडोशाला उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागते.
वैरागड येथून देलनवाडी, मानापूर पुढे अंगारा, मालेवाडा या गावांना जोडणारा हा मुख्य मार्ग असून या मार्गाला नेहमी वाहनांची वर्दळ असते. या मार्गाने आरमोरी किंवा जिल्हा मुख्यालय पर्यंत पोहोचण्यासाठी मोहझरी, सुकाळा व शिवनी येथील नागरिक या प्रवाशी निवारा जवळ थांबून वाहनाची प्रतीक्षा करीत उभे राहतात. परंतु या निवाराची कमालीची दुरवस्था झाली आहे. येथे प्रवाशांना बसायला योग्य अशी जागा नाही. परिणामी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करीत प्रवासी झाडाच्या आडोशाला उभे राहून वाहनाची प्रतीक्षा करीत असतात.
सुकाळा फाट्यावर वाहनाची प्रतीक्षा करीत थांबणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी नव्याने प्रवाशी निवाराचे बांधकाम करावे, अशी मागणी हाेत आहे.