चामाेर्शी-हरणघाट मार्गाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:13+5:302021-04-21T04:36:13+5:30
सदर मार्गावर माेठमाेठे खड्डे निर्माण झाले असून यापूर्वी डागडुजीच्या कामादरम्यान बारिक गिट्टी, चुरी रस्त्यावर टाकण्यात आली हाेती. मात्र ही ...

चामाेर्शी-हरणघाट मार्गाची दुर्दशा
सदर मार्गावर माेठमाेठे खड्डे निर्माण झाले असून यापूर्वी डागडुजीच्या कामादरम्यान बारिक गिट्टी, चुरी रस्त्यावर टाकण्यात आली हाेती. मात्र ही गिट्टी व चुरी आता बाहेर निघाली आहे. डागडुजीच्या वेळेस रस्त्यावर टाकलेली माती आता बाहेर निघाल्याने रात्रीच्या सुमारास धुळीमुळे वाहन चालवितांना कसरत करावी लागत आहे.
धुळीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास हाेत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले हाेते. काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली. मात्र स्थिती जैसे थे झाली आहे. भेंडाळा परिसरातील बऱ्याच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाच्या वतीने पक्की दुरुस्ती करण्यात येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागासाेबतच लाेकप्रतिनीधीही रस्ते विकासाबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. रस्त्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी हाेत आहे.