शिक्षण विभागातील पदे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:14 IST2016-08-05T01:14:42+5:302016-08-05T01:14:42+5:30
शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यासह गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी,

शिक्षण विभागातील पदे भरा
निवेदन : शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेची मागणी
गडचिरोली : शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यासह गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शिक्षणाधिकारी साखरे यांची त्यांच्या पक्षात भेट घेतली. यावेळी वेतनेत्तर निधी खर्चाची तरतूद, अनुदान निर्धारण, प्रलंबित मासिक वेतन आदी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, ज्ञानरचनावाद पध्दतीने अध्यापन यावरही चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष दीपक देवतळे, प्रविण शिवनकर, निखील कुमरे, यशवंत टेंभुर्णे, यू. एन. राऊत, पितांबर कोडापे, धर्मानंद मेश्राम, यशवंत टेंभुर्णे, जि.प शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी ठावरे, ज्येष्ठ सहायक सय्यद राठोड आदीसह संघटनेचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून त्या मार्गी लावणार, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. (प्रतिनिधी)