क्रीडांगणाची निर्मिती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:57 IST2018-09-17T00:56:04+5:302018-09-17T00:57:37+5:30
फुटबॉल खेळ हा अतिशय चांगला असून या खेळामुळे व्यायाम होतो व आरोग्य सुदृढ बनते. स्पर्धेच्या अयोजनामुळे सुंदरनगर परिसरातील खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होईल.

क्रीडांगणाची निर्मिती करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : फुटबॉल खेळ हा अतिशय चांगला असून या खेळामुळे व्यायाम होतो व आरोग्य सुदृढ बनते. स्पर्धेच्या अयोजनामुळे सुंदरनगर परिसरातील खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होईल. या भागाच्या विकासासाठी आपण तत्पर असून लवकरच सुंदरनगर येथे क्रीडांगणाची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.
सुंदरनगर येथील नेताजी सुभाषचंद्र फुटबॉल कमिटीद्वारे आंतरराज्यीय फुटबॉल स्पर्धा १० ते १५ सप्टेंबर या कालावधीत येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू हकिम, जि.प.सदस्य दीपक हलदार, जि.प .सदस्य रवींद्र शाहा, सरपंच पल्लवी शील, माजी सरपंच रंजीत स्वर्णकार, प्राचार्य रंजीत मंडल, मुख्याध्यापक पी. बी. मंडल, तंमुस अध्यक्ष शैलेंद्र खराती, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता उपस्थित होते. स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी हैद्राबाद व नागपूर यांच्यात खेळविण्यात आला. दोन्ही संघांपैकी एकाही संघाने वेळेत गोल केला नाही. शेवटी पेनाल्टी शॉटमध्ये नागपूर संघाने गोल करून विजय मिळविला. या स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.
प्रास्ताविक जि.प.सदस्य रवींद्र शाह यांनी केले. सुंदरनगर येथे दरवर्षी फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाते. येथे राज्य व आंतरराज्यातील संघ खेळण्यासाठी येतात. प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद लाभतो. त्यामुळे फुटबॉलचे क्रीडांगण निर्माण करावे, अशी मागणी त्यांनी केली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.