खेळाडूंनी संकुल केले स्वच्छ

By Admin | Updated: February 19, 2017 01:20 IST2017-02-19T01:20:11+5:302017-02-19T01:20:11+5:30

येथील जिल्हा संकुल परिसरातील क्रीडांगण व जलतरण तलावाच्या परिसरात क्रीडा अकादमीच्या खेळाडूंमार्फत दोन दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Players cleaned the package | खेळाडूंनी संकुल केले स्वच्छ

खेळाडूंनी संकुल केले स्वच्छ

दोन दिवस मोहीम : जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी
गडचिरोली : येथील जिल्हा संकुल परिसरातील क्रीडांगण व जलतरण तलावाच्या परिसरात क्रीडा अकादमीच्या खेळाडूंमार्फत दोन दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
संकुल परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडूपे व गवत वाढले होते. या ठिकाणची जिल्हाधिकारी नायक यांनी पाहणी करून परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंशी संवाद साधला. या सूचनेनुसार खेळाडूंनी या परिसरात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ केले. येथील जलतरण तलावाच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर उन्हाळ्यात सर्वांना वापर करणे शक्य होणार आहे. सोबतच बॅडमिंटन हॉलच्या नूतनीकरणाचे काम देखील लवकरच होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर व जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Players cleaned the package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.