शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकासात मोलाची भूमिका बजावा

By admin | Updated: June 29, 2015 02:12 IST

जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार तसेच आम्ही लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहोत.

मेळावा व सत्कार कार्यक्रम : अशोक नेते यांचे प्रतिपादनगडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार तसेच आम्ही लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहोत. जिल्ह्याचा शाश्वत व गतीने विकास होण्यासाठी संशोधन व कार्यान्वयन संस्थेने शासन व प्रशासनाकडे सूचना केल्या पाहिजेत. जिल्हा विकासात संशोधन संस्थेने मोलाची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. जिल्हा विकास संशोधन व कार्यान्वयन संस्थेच्या वतीने रविवारी आयोजित मेळावा व सत्कार कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. मारोतराव कोवासे होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हसनअली गिलानी, नगराध्यक्ष निर्मला मडके, नामदेवराव गडपल्लीवार, सत्यम चकीनारप, मनोहर हेपट, संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, कार्याध्यक्ष डॉ. मुरलीधर बद्दलवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी देवराव भोगेवार, विलास निंबोरकर, सदाशिव निंबोरकर तसेच सदस्य मुकुंदा कुळमेथे, गजानन राऊत, घनश्याम जेंगठे, वनिता बांबोळे, मंजु विष्णोई, वर्षा शेडमाके आदींनी सहकार्य केले. खा. अशोक नेते, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, नगराध्यक्ष निर्मला मडके, माजी खा. मारोतराव कोवासे व माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी व बारावीत जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संचालन सुरेश मांडवगडे, प्रास्ताविक मनोहर हेपट यांनी केले तर आभार डी. डी. सोनटक्के यांनी मानले. (प्रतिनिधी)