प्लॅटिनम ज्युबिलीच्या विद्यार्थ्यांनी केला तालिबानी हल्ल्याचा निषेध

By Admin | Updated: December 18, 2014 01:03 IST2014-12-18T01:03:40+5:302014-12-18T01:03:40+5:30

तालिबानी आतंकवाद्यांनी पाकिस्तानातील पेशावर येथील सैनिकी शाळेवर केलेल्या हल्ल्याचा गडचिरोलीच्या प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध केला.

Platinum Jubilee Students protested against Taliban attack | प्लॅटिनम ज्युबिलीच्या विद्यार्थ्यांनी केला तालिबानी हल्ल्याचा निषेध

प्लॅटिनम ज्युबिलीच्या विद्यार्थ्यांनी केला तालिबानी हल्ल्याचा निषेध

गडचिरोली : तालिबानी आतंकवाद्यांनी पाकिस्तानातील पेशावर येथील सैनिकी शाळेवर केलेल्या हल्ल्याचा गडचिरोलीच्या प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध केला. या घटनेच्या निषेधार्थ आज बुधवारी ४५० विद्यार्थ्यांनी शहराच्या मुख्य मार्गावरून मूक मोर्चा काढला. या मोर्चात विद्यार्थी, शिक्षक यांनी आपल्या तोंडावर काळीपट्टी लावली होती.
सदर मूकमोर्चाला शाळेतून सुरूवात करण्यात आली. त्यानंतर इंदिरा गांधी चौक, गांधी चौक, तलाव रोड या मार्गावरून जाऊन हा मोर्चा परत शाळेत आला व त्याचा समारोप करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी तालिबानी आतंकवाद्यांचा निषेध करणारे बॅनर्स हातात घेतले. तालिबानी-तालिबानी, इन्सान बनो, शालेय विद्यार्थ्याच्या हत्येची कठोर निंदा आतंकवाद समूह नष्ट करो, आम्ही विद्यार्थी आहोत, आमचा काय दोष, असे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. या मोर्चाचे नेतृत्व शाळेचे मुख्याध्यापक रहीम अमलानी यांनी केले. यावेळी संस्थेचे महासचिव अजीज नाथानी, उपाध्यक्ष डॉ. कमरूद्दीन लाखानी, संचालक शौकत धमानी आदी उपस्थित होते.

Web Title: Platinum Jubilee Students protested against Taliban attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.