पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा केला पंचनामा

By Admin | Updated: July 4, 2015 02:27 IST2015-07-04T02:27:26+5:302015-07-04T02:27:26+5:30

कॉम्प्लेक्स परिसरातील कलेक्टर कॉलनी भागात मागील आठवड्यात सहा दिवस पाणी पुरवठा ठप्प झाला होता.

Planting of water supply scheme | पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा केला पंचनामा

पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा केला पंचनामा

कलेक्टर कॉलनीला खासदार व आमदारांनी दिली भेट : नळ योजना कंत्राटदाराने खड्डे तत्काळ बुजवावे
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील कलेक्टर कॉलनी भागात मागील आठवड्यात सहा दिवस पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्याचबरोबर या भागात पाईपलाईनचे खड्डे कायम आहेत. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने या भागाला खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनी शुक्रवारी भेट दिली.
कलेक्टर कॉलनी व सोनापूर कॉम्प्लेक्स परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले. सदर कंत्राट चंद्रपूर येथील एका कंपनीला देण्यात आले. या कंत्राटदाराने खोदकाम केले आहे. मात्र पाईपलाईन जोडले नाही. पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यांची तोडफोड करण्यात आली. याचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले नसतानाही मुख्याधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला १२ लाखांपैकी ११ लाख ८० हजार ४२९ रूपयांचा बिल अदा केला आहे. याबाबतची तक्रार झाल्यानंतर आमदार व खासदारांनी भेट दिली. सदर काम पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती संजय मेश्राम, स्वप्नील वरघंटे, सुधाकर नाईक, रमेश अधिकारी, मारोती मेश्राम, जनार्धन मेश्राम, मंगला कोटगले यांच्यासह वार्डातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Planting of water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.