शहरात आठ ठिकाणी वृक्षारोपण
By Admin | Updated: June 30, 2017 01:07 IST2017-06-30T01:07:07+5:302017-06-30T01:07:07+5:30
राज्यात चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत १ ते ७ जुलैदरम्यान वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शहरात आठ ठिकाणी वृक्षारोपण
योगीता पिपरे यांची माहिती : गडचिरोलीत वृक्षदिंडी काढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यात चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत १ ते ७ जुलैदरम्यान वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने शहरातील आठ ठिकाणी एक हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पालिकेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, मुख्याधिकारी कृष्णा निपाने, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, अॅड. नितीन उंदीरवाडे, अल्का पोहणकर आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना नगराध्यक्ष पिपरे म्हणाल्या, १ ते ७ जुलैदरम्यान होणाऱ्या चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाची नगर परिषदेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. १ जुलै रोजी सकाळी ९ वाजता शहरातून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. या वृक्षदिंडीला खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, जि. प. अध्यक्ष योगीता भांडेकर, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शहरात लावण्यात आलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी जाळ्या बसविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.