शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अनुदानाचे योग्य नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 5:00 AM

मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, वृक्षमित्र स्वयंसेवी संस्थेचे मोहन हिराबाई हिरालाल, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे डॉ.सतीश गोगुलवार, केशव गुरनुले, महाग्रामसभेच्या सहसचिव कुमारी जमकातन, इजामसाय काटेंगे, सियाराम हलामी, झाडूराम हलामी, राजाराम नैताम उपस्थित होते.

ठळक मुद्देपडियालजोब येथे सभा : सहा तालुक्यातील ७५ ग्रामसभांच्या बैठकीत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील पडियालजोब येथे ग्रामसभांची दोन दिवसीय संयुक्त सभा पार पडली. या सभेत जिल्ह्यातील अनुदानप्राप्त ग्रामसभांनी अनुदानाचा उपयोग रितसर करून योग्य नियोजन करावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी शालिनी किरंगे होत्या. मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, वृक्षमित्र स्वयंसेवी संस्थेचे मोहन हिराबाई हिरालाल, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे डॉ.सतीश गोगुलवार, केशव गुरनुले, महाग्रामसभेच्या सहसचिव कुमारी जमकातन, इजामसाय काटेंगे, सियाराम हलामी, झाडूराम हलामी, राजाराम नैताम उपस्थित होते.आदिवासी विकास विभागामार्फत ग्रामसभांना एक वर्षात अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानाचे नियोजन करावे तसेच अडचणी आल्यास प्रशासनाची मदत घ्यावी. तसेच आदिवासी विकास विभागाकडे अहवाल पाठवावा, असे सांगण्यात आले. ग्रामसभांना अनेक वर्षांपासून अधिकार व हक्क प्राप्त झाले आहेत. या अधिकारांचा वापर ग्रामसभांनी करावा, असे आवाहन उपस्थित मार्गदर्शकांनी केले. सभेत ग्रामसभांचे अध्यक्ष सचिव, वनहक्क सनियंत्रण समिती अध्यक्ष, सचिव, ग्रामसभा सदस्य व कार्यकर्ते तसेच पडियालजोब येथील महिला, पुरूष, युवक, युवती उपस्थित झाले होते. गाववासीयांनी गावात पोलो ठेवून दाखविलेल्या एकजुटीचे मान्यवरांनी कौतुक केले. दरम्यान देवाजी तोफा, मोहन हिरालाल, डॉ.सतीश गोगूलवार, केशव गुरनुले, कुमारी जमकातन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शालिनी किरंगे यांनी आमच्या गावात आम्हीच सरकार, अशी घोषणा केली. दरम्यान पडियालजोब वासीयांनी पारंपरिक आदिवासी कोयतुरांचे मांदरी नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक राजाराम नैताम, संचालन महाग्रामसभेचे अध्यक्ष झाडुराम हलामी तर आभार मोहन हिरालाल यांनी मानले.

टॅग्स :Socialसामाजिक