पुलाजवळील खड्डा धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:19+5:30

तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर चव्हेला हे गाव आहे. या गावालगत लहान नाला वाहते. या नाल्याचे पाणी पुढे कठाणी नदीला जाऊन मिळते. धानोरा-चव्हेला हा मार्ग पुढे मुंगनेर, पेंढरी व छत्तीसगड राज्यात जातो. छत्तीसगडमध्ये जाण्यास हा मार्ग जवळ पडत असल्याने अनेक नागरिक या मार्गाचा वापर करतात. छत्तीसगडमधील आऊंदी येथे आठवडी बाजार भरते.

The pit near the bridge is dangerous | पुलाजवळील खड्डा धोकादायक

पुलाजवळील खड्डा धोकादायक

ठळक मुद्देछत्तीसगडकडे जाणारा चव्हेला मार्ग : पावसाळ्यात वाहून गेली मार्गावरील माती

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : धानोरा-चव्हेला मार्गावर असलेल्या नाल्याच्या पुलावरील अर्धा रस्ता खचला आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकाचे लक्ष नसल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर चव्हेला हे गाव आहे. या गावालगत लहान नाला वाहते. या नाल्याचे पाणी पुढे कठाणी नदीला जाऊन मिळते. धानोरा-चव्हेला हा मार्ग पुढे मुंगनेर, पेंढरी व छत्तीसगड राज्यात जातो. छत्तीसगडमध्ये जाण्यास हा मार्ग जवळ पडत असल्याने अनेक नागरिक या मार्गाचा वापर करतात. छत्तीसगडमधील आऊंदी येथे आठवडी बाजार भरते. या बाजाराला जाण्याकरिता अनेक मालवाहू वाहने याच मार्गाने जातात. पेंढरी येथे जाण्याकरिताही हा मार्ग जवळ पडतो. मुंगनेर, येनगाव, बोदीन, चव्हेला, रानवाही येथील अनेक शालेय विद्यार्थी धानोरा येथे शिक्षणासाठी येतात. तसेच नागरिक शासकीय कामासाठी येतात.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे चव्हेला गावाजवळ असलेल्या नाल्यावरील रस्ता खचून गेला आहे. पाणी वाहण्यासाठी टाकलेले सिमेंटचे पाईप दिसत आहेत. जवळपास पाच फूट खोलीचा खड्डा पडला आहे. वर्दळीमुळे पुन्हा रस्ता खचत चालला आहे.
रस्ता अतिशय चांगला असल्याने या ठिकाणावरून वाहन अतिशय वेगाने जाते. मध्येच खड्डा पडत असल्याने या खड्ड्यात वाहन जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. या खड्ड्याची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: The pit near the bridge is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.